श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमाउत्सव कार्यक्रम

शाकंभरी नवरात्र महोत्सव माहे पौष शके १९४०

प्रतीवर्षीप्रमाणे श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान,तुळजापुर तर्फे यंदाच्या नवरात्र महोत्सवात खालील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम होतील

दिनांक ०६/०१/२०१९ ते २२/०१/२०१९ पर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा

मिती वार दिनांक धार्मिक कार्यक्रम
मित्ती पौष शु.१ शके १९४० रविवार ०६/०१/२०१९ रात्रौ श्री देवीजींची मंचकी निद्रा .
मित्ती पौष शु.८ शके १९४० सोमवार १४/०१/२०१९ पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना,दुपारी १२ वाजता,घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे .
यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.९ शके १९४० मंगळवार १५/०१/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.१० शके १९४० बुधवार १६/०१/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार,रथ अलंकार महापूजा,
यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.११ शके १९४० गुरुवार १७/०१/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा मुरली अलंकार महापुजा,
यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.१२ शके १९४० शुक्रवार १८/०१/२०१९ सकाळी ७ वाजता जलयात्रा,सुवासिनींची ओटी भरणे,श्री देवीजींची नित्योपचार पूजा शेषशाही अलंकार महापुजा,
यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.१३ शके १९४० शनिवार १९/०१/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,भवानी तलवार अलंकार महापुजा,श्री देवीजींची नित्योपचार पूजा शेषशाही अलंकार महापुजा,
यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.१४ शके १९४० रविवार २०/०१/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा,सकाळी अग्नीस्थापना,देवतास्थापना शतचंडी हवनास प्रारंभ,
यजमानांच्या हस्ते शाकंभरी देवीची मंगलआरती रात्रौ ७ वाजता व रात्रौ छबिना.
मित्ती पौष शु.१५ शके १९४० सोमवार २१/०१/२०१९ शाकंभरी पोर्णीमा श्री देवीजींची नित्योपचार पूजा,
दुपारी १२.०० वाजता धुपाआरती,पूर्णाहुती घटोत्थापन व रात्रौ छबीना जोगवा.
मित्ती पौष १ शके १९४० मंगळवार २२/०१/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,महाप्रसाद अन्नदान व रात्रौ छबिना.