श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा







श्री तुळजाभवानी मंदिर अध्यक्षीय मनोगत

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानबाबत मंदिर अध्यक्ष यांचे मत

मंदिर निजाम सरकारच्या काळात अस्थित्वात होते. पूजा-याच्या भांडणातून सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका असल्यामुळे निजाम सरकारने मंदिर व्यवस्थापनासाठी १९०९ साली आपल्या ताब्यात घेतले. निजाम सरकारने मंदिर ताब्यात घेतल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापनासाठी कवायत देवूळ तयार केली त्याप्रमाणे देवूळचा कार्यभार निजाम सरकारने तयार केलेल्या नियमांप्रमाणे चालू झाला. दरम्यान मुंबई सार्वजनिक कायदा १९५० सुमारे १९६०-६१ साली लागू झाला त्याप्रमाणे देवस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा १९५० अन्वये पब्लिक ट्रस्ट म्हणून १९६२ साली झाली. निजाम सरकारने तयार केलेले कवायत देवलचे नियमाप्रमाणे व मुंबई सार्वजनिक अधिनियम १९५० च्या तरतुदीप्रमाणे सध्या या न्यास संस्थेचा व्यवहार चालतो. मंदिर व्यवस्थापनासाठी मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून त्यात विश्वस्त सदस्य म्हणून मा. उपविभागीय अधिकारी, धाराशिव, मा. विधानसभा सदस्य, तुळजापूर, मा. तहसीलदार, तुळजापूर व मा. नगराध्यक्ष, तुळजापूर हे विश्वस्थ सदस्य म्हणून काम पाहतात.

संस्थानच्या विविध सेवा