श्री सकंद पुराणात या देवीची अवतार कथा खालीलप्रमाणे दिलेली आढळते. कृत युगात कर्दम ऋषींचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करणेचे ठरविले. परंतु तिला अल्पवयी मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत घातल्याने अल्पवयी मुलासाठी तिने तो बेत रहित केला व मंदाकिनी नदीवर तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्या समयी कुकर नाम दैत्याने तिचे तापाचा व पतिव्रत्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला व अनुभूतीचे विनंतीवरून यमुनाचल (बाला घाट) पर्वतावर अखंड वास्तव केले.