श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा







श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे सुविधा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विविध प्रकारच्या सेवा व सुविधा

१. भक्तांसाठी निवास व्यवस्था

.

तुळजापूर येथे भेट देणारे भक्त पूर्वापार परंपरेनुसार आपल्या कुटुंबाच्या पूजा-याच्या घरी उतरून त्यांचेमार्फत सर्व पूजा / विधी करतात. तथापि दिवसेदिवस भक्तांची संख्या वाढत असल्याने भक्तांच्या निवासासाठी अनेक धर्मशाळा व खाजगी लॉज उपलब्ध आहेत. तसेच शासकीय विश्रामगृह व सर्किटहाउस ची सोय असून त्याचे आरक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांचेकडून होते. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन निवासही भक्तासाठी उपलब्ध आहे.

२. धर्मशाळा

.

शहरात नगरपालिकेच्या चार धर्मशाळा-सराय धर्मशाळा, सुरेख स्मृती धर्मशाळा, तसेच इतर खाजगी धर्मशाळा आहेर यादव धर्मशाळा, (धाराशिव रोड), मंदिर संस्थानची तुळजाभवानी विश्रामधाम धर्मशाळा, पद्मशाली धर्मशाळा (लातूर रोड), लोहिया धर्मशाळा (एस टी डेपो मागे) इत्यादी राहण्याच्या सोई आहेत. ासकीय विश्रामगृह व सर्किटहाउस ची सोय असून त्याचे आरक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांचेकडून होते.

३. सुरक्षा व्यवस्था

.

श्री तुळजाभवानी मंदिर व परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र शासनाकडून पोलीस चौकी मंजूर झालेली असून मंदिरात गोमुख तीर्थाचे बाजूस हि पोलीस चौकी कार्यान्वित आहे. पोलीसाबरोबर सुरक्षा व्यवस्था, रांगेवर नियंत्रण इत्यादी आवश्यक बाबीसाठी मंदिर संस्थांमार्फत क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हीसेस प्रा.लि. मुंबई निविदा प्रक्रियानुसार सुरक्षा कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेले आहेत. या शिवाय मंदिर संस्थान आस्थापनेवर अस्थाई स्वरूपात कायम पगारावर ऐकूण ११ व स्थाई रुपात ०१ माजी सैनिकाच्या सुरक्षा पहारेकरी म्हणून नियुक्ती आहेत.

४. श्री तुळजाभवानी मंदिर पोलीस चौकी व्यवस्था

.

श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षेच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून स्वतंत्र पोलीस चौकी उपलब्ध झालेली असून या ठिकाणी सुरक्षा कामासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-याच्या अधिपत्याखाली पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंदिरात असणारे पोलीस कर्मचा-यांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवणे, रांगा लावणे, मंदिर गाभा-यात शिस्त ठेवणे, ए.टी.एस व फोर्स वन विभागाकडून सुरक्षेसंदर्भात आलेल्या सुचानेप्रमाणे सुरक्षेचे काम पाहणे हि जबाबदारी आहे. तसेच उत्सव काळात आलेल्या भक्तांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येते.

५. मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्था

.

श्री तुळजाभवानी मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता साहित्यासह स्वच्छता कर्मचारी व लिपिक कर्मचारी पुरविण्याचा करार क्रिस्टल इंटिग्रेटेड सेर्व्हीसेस प्रा.लि. मुंबई या कंपनीसमवेत करण्यात आलेला आहे. संबधित कंपनीमार्फत निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे अत्याधुनिक मशीन्सद्वारे स्वच्छतेचे काम करवून घेण्यात येत आहे.

६. देणगी

.

श्री तुळजाभवानी देवीस भाविक रोख रक्कमेस सोने, चांदी व इतर वस्तूंच्या स्वरुपात (उदा. ट्यूब] पंखे, बल्ब, समई, पशु, पक्षी, अन्नधान्य इ.) देणगी अर्पण करतात. सदरची प्राप्ती होणारी देणगी स्वीकारली जाते. रोख रक्कम व सोने चांदी देणगी भाविकांनी अर्पण केल्यानंतर त्यांना एस एम एस देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन देणगी ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.