६. श्रावण शुध्द //१५// पौर्णिमा (नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन )
चरणतिर्थास व धुपआरतीच्या वेळी श्रीस राखी रक्षाबंधन निमीत्त अर्पण करण्यात येते. या दिवशी सकाळच्या अभिषेक पुजेच्या वेळी मंदिर संस्थानाचा प्रतिनिधी अभिषेक पुजेस हजर रहावे लागते. अभिषेक पुजेस सुरुवात करणेस गेल्या नंतर पुजारी पंचआरती ओवाळतात. तत्पुर्वी या आरतीस मंदिर संस्थानच्या अभिषेक सुरुवात करण्यास गेलेल्या प्रतिनिधीने पंचारतीस स्पर्श करुन नमस्कार करावा. यानंतर पुजारी श्रीस आरती करतील प्रतिनिधीनी सिंहासनावर डोके ठेवून नमस्कार करावा.