२. चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढीपाडवा)- मराठी सवंत्स र शालिवाहन शक
या दिवशी पहाटे ४ वाजता चरणतिर्थ होते. चरणतिर्थाच्या वेळैस भाविकांनी अर्पण केलेला साखरेचा हार श्रीस घालण्याात येतो. चरणतिर्थ होवून सुर्यादय समयी मंदीराच्या मुख्य् शिखरासमोर छतावर मंदीर संस्था मार्फत गुढी उभारण्यात येते. या गुढीकरीता कळसाची आब्दासगीरी,महावस्त्र् , सेवाधारी यांना देण्याात येते. महंत तुकोजी बुवा चरणतिर्थानंतर सदर अब्दासगिरीस फुलाने पाणी शिंपडून उगळलेल्या चंदनाचा गंध, हळद-कुंकु, अष्टगंध, गुलाल, बुक्काम, अक्षदा वाहवून या आब्दागिरीस श्रीला नेसवलेले महावस्त्र् ,खण पांघरुन घालून यास लिंबाचा एक डहाळा,साखरेचा हार घालुन गुढी मुख्य शिखरासमोर उभारण्यात येते.