
सर्वसाधारण माहिती
श्रीक्षेत्र तुळजापूर ट्रस्ट विषयी सर्वसाधारण माहिती खालील प्रमाणे आहे.
- मंदिर व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून, मंदिर समिती मार्फत, विविध विकासात्मक कामे केली जातात.
- तसेच श्री देविजींची यात्रा१२ ही महिने चालू असते. यामध्ये मुख्य यात्रा / उत्सव :-
- शारदीय नवरात्र महोत्सव हा श्री देविजीच्या साज-या होणा-या यात्रा उत्सवापैकी महत्वाचा उत्सव असून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन वद्य १६ या कालावधीत हा महोत्सव साजरा होतो.
- नवरात्रीच्या नऊ दिवसांसह दशमी व कोजागिरी पोर्णिमा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यासह शेजारील अनेक राज्यातून भाविक श्री देविजींच्या दर्शनासाठी येतात.
- तसेच मंदिरात दररोज विविध प्रकारच्या पूजा होत असतात जसे कि ओटी भरण, अभिषेक पूजा, सिंहासन महापूजा, गोंधळ पूजा, दंडवत, जावळ काढणे इत्यादी.
- मंदीर संस्थान मार्फत भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उदा. भक्तांसाठी निवास व्यवस्था, धर्मशाळा, दर्शन पास इत्यादी.
१. शारदीय नवरात्र महोत्सव
२. शाकंभरी नवरात्र महोत्सव
३. अश्विन पोर्णिमा
४. चैत्री पोर्णिमा

