Skip to main content


उत्सवाचे महत्त्व

श्रीक्षेत्र तुळजापूर उत्सवाचे महत्त्व खालील प्रमाणे आहे.

  • निवासस्थानापासून एक मोठा कणकेचा गोळा दिवा व त्यांमध्ये वात लावून तो दिवा एका छोट्या ताटात ठेवून त्याची विधिवत पूजा करून दीप प्रज्वलित करून सदर ताट डोक्य्यावर ठेवून भाविक मंदिरात येतात व संपूर्ण मंदिरास प्रदक्षिणा मारतात.
  • प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सदरचा दिवा होमाचे मागे विसर्जीत करतात. हा पूजा विधी संकल्पसिद्धीसाठी केला जातो. एखादा संकल्प पूर्ण होणार का याचे शंका निरसन असे आहे कि, सदरचा दिवा संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत प्रज्वलित राहीला तर संकल्प पूर्ण होणार अशी भाविकांची श्रद्धा आहे.
  • याठिकाणी श्री देविजींस भाविकाकडून पुरणपोळी, दहीभाताचे नैवद्य दाखविले जातात. श्रीदेविजीच्या पायाखाली असलेल्या महिषासुर या दैत्यास मांसाहारी नैवद्य दाखविला जातो. सकाळी चरणतीर्थाचे वेळी भाजी भाकरी व खीर (पायस) यांचा नैवद्य दाखविला जातो.
  • सकाळीचे व सायंकाळीचे अभिषेक संपल्यानंतर आरती व धुपारती वेळी ज्या भोपे पुजा-याची पाळी आहे त्याच्या घराचा साखर भाताचा व हैद्राबाद संस्थानचा दोन भाज्या, साधी पोळी, वरण, भाताचा नैवद्य श्रीदेविजींना दाखविला जातो.
  • प्रक्षाळ पूजेचे वेळी महंत वाकोजी बुवा मठाकडून व हमरोजी बुवा मठाकडून नैवद्य दाखविला जातो.

About Us

The temple was registered as a public trust under the Bombay Public Act, 1950 in 1962. The affairs of this judicial institution are currently being conducted in accordance with the rules of the Kawayat Deval framed by the Nizam's government and the provisions of the Bombay Public Act, 1950.

Contact Us

Mahadwar Road, Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. 413601, India.
Monday to Sunday: 10:00 am to 6:00 pm
9422956830 / 9067257215