Skip to main content

दैनंदिन कार्यक्रम

श्री तुळजाभवानी देविजीची रोजची पूजा कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी हे एक मुख्य पीठ आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुका येथे हे देवस्थान स्थित आहे.

सहज दर्शनाचे वेळी किंवा इच्छा झाल्यास भक्त श्रीची पाध्य पूजा करून ओटी भरण भरतात. ही पूजा मंदिर उघडल्यापासून बंद होईपर्यत कोणत्याही वेळेत करता येते.

श्री देविजींना सकाळी ०६.०० ते १०.०० व सायंकाळी ०७.०० ते ०९.०० या वेळेत अभिषेक पूजा घालण्यात येतात. सध्या अभिषेक पूजेचे सुरवातीस छत्रपती संस्थान कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या दुधाची गुंडी (कळशी) श्री देविजीच्या मूर्तीवर ओतली जाते. बाकी इतर सर्व अभिषेक पूजा व सिंहासन पूजा या श्री देविजीच्या मूर्तीसमोर चांदीच्या पादुका ठेऊन केले जातात.

सिंहासन महापूजा ही दही, दुध, श्रीखंड, आंब्याचा रस, उसाचा रस यापैकी ज्याचे त्याचे इच्छेप्रमाणे एका प्रकारात केली जाते. सिंहासन पूजेसाठी ७० लिटर साहित्याचा वापर केला जातो. सिंहासन पूजा ही बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून दररोज सकाळीचे पूजेचे वेळी ०५ व सायंकाळचे पूजेचे वेळी ०२ सिंहासन पूजा करण्यात येतात.

मुख्य मंदिराचे बाहेरील बाजूस असणारे पोलीस गार्ड समोरील पारावर हि पूजा केली जाते. गोंधळी श्री देविजींची पारंपारिक स्तवने संभळच्या निनादात म्हणतात व ही पूजा केली जाते. ही पूजा मुख्यत्वे नवविवाहित भाविकांकडून केली जाते. गोंधळ पूजा ही पूजा कुलाचाराचा एक प्रकार आहे.

आपल्या घरापासून किंवा श्री क्षेत्री असलेल्या निवासापासून अथवा मंदिराचे होमकुंडापासून कल्लोळ व गोमुख तीर्थात स्नान करून ओल्या पडद्याने भाविक साष्टांग दंडवटाद्वारे मंदिरास प्रदक्षिणा मारतात या विधीस दंडवत विधी म्हणतात. नवसपुर्तीनंतर भाविकांकडून हा विधी केला जातो.

आपल्या मुलाचे, मुलीचे प्रथम केस कर्तन कुलदेवतेच्या दरबारात करण्याच्या इच्छेनुसार किंवा नवसपूर्ती नंतर बरेच भाविक मंदिरात असणारे गोंधळी पाराचे खालील बाजूस हा विधी करतात.

श्री तुळजाभवानी देवीची आराधना करण्यासाठी ही देवी ज्यांची कुलदैवता आहे असे भाविक या ठिकाणी येऊन कवड्यांची माळ व परडी श्री देविजींच्या चरणास लाऊन घेतात व मंदिरात पोत पाजळून नैवद्य वगैरे दाखून सदर माळ, परडी व पोत आपल्या गावी घेऊन जातात. व देवघरात ठेऊन त्यांची नित्य पूजा करतात. विशेषतः मंगळवार व पोर्णिमेदिवशी शेजारी असणारे पाच घरात जाऊन श्री देविजींच्या नावाने जोगवा मागतात. पूर्वापार प्रथेनुसार ही पूजा एक कुलाचाराचाच प्रकार आहे.

असे अनेक भाविक आपल्या स्वतःच्या घरासाठी श्री देविजींना पानाचे घर अथवा फुलाचे घर वाहीन असा नवस करतात. नवसपूर्ती झाल्यानंतर ही पूजा करण्यासाठी श्री क्षेत्र तुळजापूर येथे येतात व ही पूजा बांधतात. सदरची पूजा ही संध्याकाळचे अभिषेक पूजा संपल्यानंतर आरती व धुपारती नंतर बांधली जाते ती दुसऱ्या दिवशी चरणतीर्थापर्यंत ठेवली जाते.

निवासस्थानापासून एक मोठा कणकेचा गोळा दिवा व त्यांमध्ये वात लावून तो दिवा एका छोट्या ताटात ठेवून त्याची विधिवत पूजा करून दीप प्रज्वलित करून सदर ताट डोक्य्यावर ठेवून भाविक मंदिरात येतात व संपूर्ण मंदिरास प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सदरचा दिवा होमाचे मागे विसर्जीत करतात. हा पूजा विधी संकल्पसिद्धीसाठी केला जातो. एखादा संकल्प पूर्ण होणार का याचे शंका निरसन असे आहे कि, सदरचा दिवा संपूर्ण प्रदिक्षिणा पूर्ण होईपर्यंत प्रज्वलित राहीला तर संकल्प पूर्ण होणार अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आपल्या घरापासून किंवा श्री क्षेत्री असलेल्या निवासापासून अथवा मंदिराचे होमकुंडापासून कल्लोळ व गोमुख तीर्थात स्नान करून ओल्या पडद्याने भाविक साष्टांग दंडवटाद्वारे मंदिरास प्रदक्षिणा मारतात या विधीस दंडवत विधी म्हणतात. नवसपुर्तीनंतर भाविकांकडून हा विधी केला जातो.

याठिकाणी श्री देविजींस भाविकाकडून पुरणपोळी, दहीभाताचे नैवद्य दाखविले जातात. श्रीदेविजीच्या पायाखाली असलेल्या महिषासुर या दैत्यास मांसाहारी नैवद्य दाखविला जातो. सकाळी चरणतीर्थाचे वेळी भाजी भाकरी व खीर (पायास) यांचा नैवद्य दाखविला जातो. सकाळीचे व सायंकाळीचे अभिषेक संपल्यानंतर आरती व धुपारती वेळी ज्या भोपे पुजा-याची पाळी आहे त्याच्या घराचा साखर भाताचा व हैद्राबाद संस्थानचा दोन भाज्या, साधी पोळी, वरण, भाताचा नैवद्य श्रीदेविजींना दाखविला जातो. प्रक्षाळ पूजेचे वेळी महंत वाकोजी बुवा मठाकडून व हमरोजी बुवा मठाकडून नैवद्य दाखविला जातो.

About Us

The temple was registered as a public trust under the Bombay Public Act, 1950 in 1962. The affairs of this judicial institution are currently being conducted in accordance with the rules of the Kawayat Deval framed by the Nizam's government and the provisions of the Bombay Public Act, 1950.

Contact Us

Mahadwar Road, Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. 413601, India.
Monday to Sunday: 10:00 am to 6:00 pm
9422956830 / 9067257215