श्री तुळजा भवानी मंदिरात आपले स्वागत आहे
१९६२ साली या मंदिराची बॉम्बे पब्लिक ॲक्ट, १९५० अंतर्गत सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. या धार्मिक संस्थेचे कामकाज सध्या निजामाच्या सरकारने तयार केलेल्या 'देऊल ए कवायत'च्या नियमांनुसार आणि बॉम्बे पब्लिक ॲक्ट, १९५० च्या तरतुदींनुसार चालवले जात आहे.
उत्सव

शारदीय नवरात्री उत्सव
तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात
मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला
जातो. अश्विन प्रतिपदे पासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) या शारदीय उत्सवास सुरुवात होते. त्यामागील पौराणिक
कथेनुसार महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी
मंचकी जाते. नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला भारतीय संस्कृतीतला मोठा सण दसरा असतो.

शाकंभरी नवरात्री
प्रत्येक वर्षी पौष महिन्यात ( डिसेंबर / जानेवारी महिन्यात ) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व
पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच याही उत्सवाला भाविकांची गर्दी
असते. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात
होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही, असे भाविक शाकंभरी
नवरात्राच्या सोहळ्यास सहभागी होण्याकरिता व देवीच्या दर्शनाकरिता आवर्जून तुळजापूरला येतात.

विजयादशमी दसरा
उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते. या दिवशी बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथूनपलंग यांचे आगमन होते. तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर विश्रांती (श्रमनिद्रा) घेते. दसरा ह्या सणांचं मोठ्या
उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार,
नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे
दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशित
केली जातात.
मंदिराचा इतिहास
श्री स्कंद पुराणात या देवीची अवतार कथा खालीलप्रमाणे दिलेली आढळते. कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करण्याचे ठरविले. परंतु तिला अल्पवयीन मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत काढल्याने अल्पवयीन मुलासाठी तिने तो बेत रहित केला व मंदाकिनी नदीवर तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्या समयी कुकुरनामा नाम दैत्याने तिच्या तपाचा व पतिव्रत्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला व अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल (बाला घाट) पर्वतावर अखंड वास्तव केले.
अधिक वाचा
छायाचित्र संग्रह



तीर्थयात्री सेवा
दर्शन पास

देणगी दर्शन पास (३०० रुपये ) भाविकांना लांब रांगा टाळून जलद आणि प्राधान्य (Priority) दर्शन घेण्यास मदत करतात. या पासचे दर हंगाम आणि गर्दीनुसार बदलू शकतात.
दर्शन पास बुक करा
अभिषेक पूजा

श्री देविजींना सकाळी ०६.०० ते १०.०० व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० या वेळेत अभिषेक पूजा घालण्यात येतात. सध्या अभिषेक पूजेचे सुरवातीस छत्रपती संस्थान कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या दुधाची गुंडी (कळशी) श्री देविजीच्या मूर्तीवर ओतली जाते.
अभिषेक पूजा बुक करा
सिंहासन पूजा

सिंहासन महापूजा ही दही, दुध, श्रीखंड, आंब्याचा रस, उसाचा रस यापैकी ज्याचे त्याचे इच्छेप्रमाणे एका प्रकारात केली जाते. सिंहासन पूजेसाठी ७० लिटर साहित्याचा वापर केला जातो. सिंहासन पूजा ही बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून दररोज सकाळीचे पूजेचे वेळी ०५ व सकाळच्या पूजेच्या वेळी ०२ सिंहासन पूजा करण्यात येतात.
सिंहासन पूजा बुक करा


