Skip to main content

सेवा आणि सुविधा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान - विविध प्रकारच्या सेवा व सुविधा

१. भक्तांसाठी निवास व्यवस्था

तुळजापूर येथे भेट देणारे भक्त पूर्वापार परंपरेनुसार आपल्या कुटुंबाच्या पूजा-याच्या घरी उतरून त्यांचेमार्फत सर्व पूजा / विधी करतात. तथापि दिवसेदिवस भक्तांची संख्या वाढत असल्याने भक्तांच्या निवासासाठी अनेक धर्मशाळा व खाजगी लॉज उपलब्ध आहेत. तसेच शासकीय विश्रामगृह व सर्किटहाउस ची सोय असून त्याचे आरक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांचेकडून होते. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन निवासही भक्तासाठी उपलब्ध आहे.

२. धर्मशाळा

शहरात नगरपालिकेच्या चार धर्मशाळा-सराय धर्मशाळा, सुरेख स्मृती धर्मशाळा, तसेच इतर खाजगी धर्मशाळा आहेर यादव धर्मशाळा, (धाराशिव रोड), मंदिर संस्थानची तुळजाभवानी विश्रामधाम धर्मशाळा, पद्मशाली धर्मशाळा (लातूर रोड), लोहिया धर्मशाळा (एस टी डेपो मागे) इत्यादी राहण्याच्या सोई आहेत.सकीय विश्रामगृह व सर्किटहाउस ची सोय असून त्याचे आरक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव
यांचेकडून होते.

३. सुरक्षा व्यवस्था

श्री तुळजाभवानी मंदिर व परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र शासनाकडून पोलीस चौकी असून महाद्वार च्या बाजूस ही पोलीस चौकी कार्यान्वित आहे. पोलीसाबरोबर सुरक्षा व्यवस्था, रांगेवर नियंत्रण इत्यादी आवश्यक बाबीसाठी मंदिर संस्थांमार्फत निविदा प्रक्रियानुसार सुरक्षा कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेले आहेत.

४. मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्था

श्री तुळजाभवानी मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता साहित्यासह स्वच्छता कर्मचारी व लिपिक कर्मचारी पुरविण्याचा करार बीव्हीजी या कंपनीसमवेत करण्यात आलेला आहे. संबधित कंपनीमार्फत निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे स्वच्छतेचे काम करवून घेण्यात येत आहे.

५. देणगी

श्री तुळजाभवानी देवीस भाविक रोख रक्कमेस सोने, चांदी व इतर वस्तूंच्या स्वरुपात (उदा. ट्यूब, पंखे, बल्ब, समई, पशु, पक्षी, अन्नधान्य इ.) देणगी अर्पण करतात. सदरची प्राप्ती होणारी देणगी स्वीकारली जाते. ही सुविधा करण्यात आलेली आहे.

About Us

The temple was registered as a public trust under the Bombay Public Act, 1950 in 1962. The affairs of this judicial institution are currently being conducted in accordance with the rules of the Kawayat Deval framed by the Nizam's government and the provisions of the Bombay Public Act, 1950.

Contact Us

Mahadwar Road, Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. 413601, India.
Monday to Sunday: 10:00 am to 6:00 pm
9422956830 / 9067257215